नगरपरिषदेच्या नगराध्यपदाची सोडत निघाली
गंगापूर :
अलिम चाऊस
गंगापूर राज्यातील २४७ नगर परिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी सोडत झाली. गंगापूर नगर परिषद खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद असलेल्या नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपदांचा समावेश आहे.
२०२० सालापासून नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका रखडल्या आहेत. आगामी काळात त्या निवडणुका शक्यता असल्याने होण्याची नगराध्यक्ष पदासाठी सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले. पुढील पूर्ण पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपद खुले झाल्याने स्पर्धा कुटुंबातील सदस्य मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. कोण होणार गंगापूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष ? गंगापूर नगर पालिका प्रभाग संख्या १० व नगरसेवक सदस्य २० निवड करायची आहे. जनतेतून खुला प्रवर्ग नगराध्यक्ष साठी मतदान होणार आहे.
निर्वाचित सदस्य संख्या २०११ च्या जनगणनेनुसार सन २०११ च्या जनगणनेनुसार या गंगापूर नगर पालिका क्षेत्रात निर्वाचित सदस्य संख्या निश्चित केलेली आहे. यानुसारच निवडणूक होणार आहे. येथील नगर पालिकेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राहिल्याने अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, ऐन थंडीत शहराचे राजकारण चांगलेच तापणार आहे. सन २००६ व २०११ च्या सुरुवातीच्या अडीच वर्षांनंतर यावेळी पुढील पूर्ण पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपद खुले झाल्याने स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे. खुल्या प्रवर्गासाठी पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होणार असल्याने तुल्यबळ लढतीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
परिणामी अनेक पक्षांसह इच्छुकांनी दंड थोपटले आहे. गंगापूर येथे महायुती आणि महाविकास आघाडीतच लढत होण्याची शक्यता आहे. इच्छुक भावी नगराध्यक्षासाठी पुढील प्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने माजी नगराध्यक्ष संजय जाधव, भाजपच्या वतीने शहराध्यक्ष मारुती खैरे, प्रदीप पाटील, सचिन मुंदडा, उद्धवसेनेच्या वतीने शहराध्यक्ष भाग्येश गंगवाल, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, तर काँग्रेसच्या वतीने संदीप दारुंटे, नईम मन्सुरी, इच्छुकमध्ये सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप, योगेश पाटील, फैसल चाऊस, यांची चर्चा आहे.
आ. बंब ठरविणार महायुतीचा उमेदवार :
नगराध्यक्ष पदाचा महायुतीचा उमेदवार आमदार प्रशांत बंब हेच ठरविण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये आमदार सतीश चव्हाण हे दोघे एकत्र येऊ शकत नसल्यामुळे महायुती होण्याची शक्यता नाही? विधानसभा निवडणुकीतील गंगापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजय जाधव हेही सर्व तयारीनिशी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.